मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी महिला कामगारांचे आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी स्थगित; जतीन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

महिला कामगारांचे आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी स्थगित; जतीन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

 पालघर | प्रतिनिधी

पालघर तालुक्यातील शहर वेवुर परिसरातील "मस्टंग एंटरप्रायझेस कंपनी


महिला कामगारांना कथितरित्या बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले. कामगार विभागाने प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर महिला कामगारांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


या प्रकरणाला दरम्यान नवे वळण मिळाले असून पालघर पोलीस ठाण्यात जतीन प्रकाश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध एफआयआरनुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ७९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, फिर्यादी महिला कामगाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


कामगार विभागाने संबंधित आस्थापनाची चौकशी करून कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास मालक व जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कामगारांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या घडामोडींमुळे पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


महिला कामगारांना न्याय मिळतो का, तसेच पोलीस आणि कामगार विभागाच्या चौकशीतून नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने