मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी बिबट्या प्रवण क्षेत्रात घ्यावयाची खबरदारी व उपाययोजनांबाबत नागरी संरक्षण स्वयंसेवकांना मार्गदर्शन*

बिबट्या प्रवण क्षेत्रात घ्यावयाची खबरदारी व उपाययोजनांबाबत नागरी संरक्षण स्वयंसेवकांना मार्गदर्शन*

 


*बोईसर, जि. पालघर :* महाराष्ट्र शासन, गृह विभाग, विशेष नागरी संरक्षण दल, तारापूर, जिल्हा पालघर अंतर्गत बोईसर विधानसभा क्षेत्र येथे दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी "डीव्हिजनल डे" निमित्त बिबट्या प्रवण क्षेत्रात घ्यावयाची खबरदारी व आवश्यक उपाययोजना या विषयावर नागरी संरक्षण स्वयंसेवकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

      सदर कार्यक्रम पालघर जिल्हा उपनियंत्रक माननीय श्री. के. आर. कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बोईसर विधानसभा क्षेत्र विभागीय क्षेत्ररक्षक श्री. नरेश अनंत म्हस्के यांच्या पुढाकाराने व नियोजनातून करण्यात आले.

       या कार्यक्रमात Wildlife Conservation Animal Welfare Association यांच्या माध्यमातून श्री.सूर्यहास चौधरी व श्री.भावेश बाबरे यांनी बिबट्या प्रवण क्षेत्रात नागरिकांनी व नागरी संरक्षण स्वयंसेवकांनी घ्यावयाची आवश्यक खबरदारी, बिबट्याचा वावर आढळल्यास करावयाच्या उपाययोजना, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या पद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

       बिबट्या हा वन्यजीव असून त्याचा अधिवास व मानवी वस्ती यांच्यातील संपर्क वाढत असताना नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता, सुरक्षितता व योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. बिबट्याचा वावर आढळल्यास त्याला चिथावणी न देणे, त्याच्या जवळ जाण्याचा अथवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न न करणे, गर्दी न करणे तसेच संबंधित वनविभाग व प्रशासनास तात्काळ माहिती देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

      कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरी संरक्षण स्वयंसेवकांना बिबट्या प्रवण क्षेत्रातील संभाव्य धोके ओळखणे, नागरिकांना योग्य सूचना देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने कार्य करणे याबाबत आवश्यक माहिती देण्यात आली. तसेच वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल राखण्यासाठी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे नागरी संरक्षण स्वयंसेवकांना बिबट्या प्रवण क्षेत्रात कार्य करताना आवश्यक असलेले ज्ञान व सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती मिळून, भविष्यातील संभाव्य घटनांमध्ये अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत होणार आहे.

      यावेळी मास्टर ट्रेनर श्री.गौरव पाटील,दुर्घटना नियंत्रण अधिकारी सौ.सुषमा जाधव,स्वयंसेवक हे उपस्थित होते.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने