पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या स्नेहल सावंत यांचे पुणे येथे उपचारादरम्यान बुधवार, 26 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
12 जून रोजी पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात स्नेहल सावंत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले होते.
गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाही अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
स्नेहल सावंत यांच्या निधनाची बातमी समोर येताच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, सहकारी आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्नेहल सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
जागरूक आवाज न्यूज
पालघर जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत...
