मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी बोईसरमध्ये हरिदया फाउंडेशनचा मेगा वृक्षारोपण उपक्रम; १०१ रोपांची लागवड

बोईसरमध्ये हरिदया फाउंडेशनचा मेगा वृक्षारोपण उपक्रम; १०१ रोपांची लागवड

 बोईसर, २२ ऑगस्ट २०२६ : हरिदया फाउंडेशन (नोंदणीकृत) यांच्या वतीने हनुमान नगर येथे शनिवारी मेगा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विविध जातींची तब्बल १०१ रोपे लावण्यात आली.


हनुमान नगर ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा तसेच हनुमान नगर येथील खेळाच्या मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच परिसर हिरवागार करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सरपंच मॅडम तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत बिस्किटांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी श्री. विनायक अंधेर यांनी मोलाचे सहकार्य केले.


हरिदया फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश हरिनाथ यादव यांनी स्वच्छ, सुंदर व हरित पालघर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच मुलींमध्ये आधुनिक शिक्षणाचे महत्त्व याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र यादव, मुकेश, योगेश, मीरा, शिवाजी, रामयश, शैलेश, धर्मवीर, सचिन, आदर्श आणि आँचल यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.




संपर्क :

डॉ. राजेश हरिनाथ यादव

अध्यक्ष, हरिदया फाउंडेशन

मो. ९९६७३१०७४०

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने