पालघर | प्रतिनिधी :
शिवसेना पक्षात शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांबाबत कठोर भूमिका घेत शिवसेना नेतृत्वाने पालघर जिल्ह्यातील सात पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार आणि शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून संबंधित पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून निष्कासित करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बेजबाबदार वागणूक आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
पक्षातून निष्कासित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये—
श्री. कुंदन बाळकृष्ण संखे — जिल्हाप्रमुख
श्री. राहुल रामदास घरत — शहरप्रमुख
श्री. मनोज ऊर्फ विक्की संखे — उपतालुकाप्रमुख
श्री. साईराज पाटील — जिल्हाप्रमुख युवासेना
श्री. रोहित गावीत— उपतालुकाप्रमुख युवासेना
श्री. राहुल संखे — उपतालुकाप्रमुख
श्री. ऋषभ वारे — युवासेना विधानसभा प्रमुख
यांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विशेषतः जिल्हास्तरावरील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर करण्यात आलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पक्षशिस्तीला सर्वोच्च प्राधान्य देत पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
