मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी कुटासा गावात मोकाट डुकरांचा धुमाकूळ! नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष

कुटासा गावात मोकाट डुकरांचा धुमाकूळ! नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष

 कुटासा : अकोट तालुक्यातील कुटासा गावात मोकाट डुकरांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गावातील वस्ती तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट डुकरांचा वावर वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डुकरांमुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होत असून दुर्गंधीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे.


या समस्येबाबत भूषणकुमार सुनील गावंडे यांनी ग्रामपंचायत कुटासा यांच्याकडे तक्रार अर्ज साद करून मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तक्रार अर्जात मोकाट डुकरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


तसेच मोकाट डुकरे अचानक रस्त्यावर येत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी एका मादी डुकराने सुमारे १५ ते १६ पिलांना जन्म दिल्याने परिसरात डुकरांची संख्या वाढल्याचे तक्रारीत नमूद आहे.


यापूर्वीही ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली होती; मात्र ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन मोकाट डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त कधी करणार? याकडे कुटासा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




🔥 थोडक्यात वर्णन

कुटासा गावात मोकाट डुकरांचा वाढता उपद्रव; अस्वच्छता, आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज दाखल करून कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी.

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने